Ad will apear here
Next
पोहा आणि तंदुरुस्त रहा...
पोहण्याकडे सर्वसाधारणपणे छंद म्हणून बघितलं जातं. रिकाम्या वेळेत किंवा वेळ मिळेल तेव्हा लोक पोहायला जातात. पोहणे हा एक उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे नियमितपणे पोहण्याचा व्यायाम केल्यास नक्कीच चांगला फायदा होतो. पोहताना काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्याविषयी...
...... 
पोहण्यामुळे बऱ्याच कॅलरी खर्च होऊ शकतात, त्यामुळे वजन कमी होतं, तसेच शरीर पीळदार होते. योग्य पद्धतीने पोहल्यामुळे धावण्यासारखे लाभ मिळू शकतात. शिवाय गुडघ्याच्या सांध्यांनाही त्रास होत नाही. कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती पोहण्याचा व्यायाम करू शकतात. 

व्यायाम कोणताही असला तरी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. व्यायाम आणि पोषक आहार यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. पोहताना भरपूर ऊर्जा खर्च होते आणि थंड पाण्यामुळे कडकडून भूक लागते. यामुळे अतिखाणं होऊ शकतं. हा मोह टाळायला हवा. उगाचच तेलकट पदार्थ, जंक फूड न खाता, हिरव्या भाज्या, प्रोटिन शेक घेणे योग्य ठरेल.

पोहण्याच्या क्रियेत वेगवेगळे स्ट्रोक्स असतात. प्रत्येक स्ट्रोकचे वेगळे फायदे आहेत; मात्र बटरफ्लाय स्ट्रोक सर्वाधिक लाभदायी ठरतो. या स्ट्रोकमुळे फक्त दहा मिनिटांत जवळपास १५० कॅलरी खर्च होतात. यानंतर फ्रीस्टाईल या स्ट्रोकमुळे तासाला ७०४ कॅलरी खर्च होतात.

वजन कमी करण्याच्या उद्देशाने पोहायचं असेल, तर जरा जास्त प्रयत्न करावे लागतील. पोहण्याचा वेग अधिक असेल तर जास्त कॅलरी खर्च होतात. त्यामुळे पोहण्याचा वेग शक्य तितका वाढवा.

शक्यतो सकाळी न्याहरीआधी पोहावे. सकाळच्या वेळी पोहल्यामुळे शरीरातल्या फॅट्सचा सर्वाधिक वापर होईल. ऊर्जा मिळवण्यासाठी या फॅट्सचा वापर होईल आणि  वजनही कमी होईल.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZASCH
Similar Posts
८७ वर्षांच्या मधुकर तळवलकरांकडून घ्या फिटनेसचा आदर्श (व्हिडिओ) देशभरात प्रसिद्ध असलेल्या तळवलकर व्यायामशाळेचे मधुकर तळवलकर यांचा ८७वा वाढदिवस नुकताच झाला. त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. व्यायामाच्या अत्यंत काटेकोर सवयीमुळे त्यांनी ही आरोग्यसंपन्नता साध्य केली आहे. त्यांचा याबद्दलचा प्रेरणादायी व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ येथे देत आहोत
निरोगी जीवनशैलीत व्यायामाचे महत्त्व निरोगी जीवनशैलीत आहार आणि व्यायाम या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ‘खा, प्या, स्वस्थ राहा : डाएट मॅटर्स’ या पुस्तकात कल्याणी लद्दू-जावडेकर आहार अर्थात डाएट आणि त्यासोबतच व्यायामाचे महत्त्व, तसेच निरोगी जीवनशैलीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत
व्यायामशाळेत होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष नको! हल्लीच्या अद्ययावत व्यायामशाळा म्हटले, की तिथे स्पिनिंग, झुंबा, पावर योगा, अॅब्स अशा विविध प्रकारच्या व्यायामाच्या बॅचेस असतात. काहीही विचार न करता, कोणाचाही सल्ला न घेता, ‘पैसे वसूल झाले पाहिजेत’, या आवेगात बऱ्याच चुका होतात... यासाठीच ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या व्यायामशाळेतील चुकांबद्दल...
माझी वेटलॉसची कहाणी - शेफाली वैद्य माझी वेटलॉसची कहाणी तशी बायकांच्या मॅगझिनमध्ये येते तशी एकदम नाट्यमय वगैरे मुळीच नाही. माझ्या वर्षापूर्वीच्या आणि आताच्या फोटोमध्ये फरक जरूर पडलाय; पण अगदी बिकिनी रेडी बॉडी वगैरे असं काही झालेलं नाहीये आणि ते मला करायचंही नाहीये. फक्त आयुष्याच्या ह्या वळणावर असताना जगण्यातील सर्व पैलू मला मनसोक्त एन्जॉय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language